महदी, अल्
महदी, अल् : (१२ ऑगस्ट १८४४−२२ जून १८८५). आधुनिक सूदानचा शिल्पकार व महदी क्रांतीचा सूत्रधार. त्याचे पूर्ण नाव मुहम्मद अहमद इब्न अस्-अल्लाह. त्याचा जन्म विद्यमान उत्तर सूदानमधील नाईल नदी जवळच्या न्यूबिया प्रदेशातील डाँगोला जिल्ह्यातील सधन घराण्यात झाला.